श्री एकनाथ अंबाजी पाटील हे गेली 23 वर्षे एल आय सी चे विमा प्रतिनिधी
म्हणून काम करत आहेत. एल आय सी च्या विमा धारकांना देत असलेल्या सुविधा
लक्षात घेऊन एल आय सी ने त्यांना अधिकृत विमा हप्ता केंद्र दिलेले आहे.
यामुळे परिसरातील बहुतांशी नागरिकांचा कल त्यांच्याकडून विमा पॉलिसी घेणेचा
असतो. एल आय सी बरोबरच नागरिकांना इतरही विमाविषयक सुविधा देता याव्यात
म्हणून ते स्टार हेल्थ इन्शुरन्स च्या मेडिक्लेम पॉलिसी देत असतात. तसेच
जनरल इन्शुरन्स साठी न्यू इंडिया ऍ्शुरन्स या कंपनीच्या पॉलिसी ते देतात.
एकूणच नागरिकांना विमा विषयक वेगवेगळ्या सुविधा एकाच छताखाली देण्याचा
त्यांचा हा प्रयत्न उल्लेखनीय आहे. नागरिकांना बचतीबरोबरच सुरक्षाही मिळावी
यासाठी त्यांची ही धडपड असते. जयसिंगपूर आणि परिसरात विमा प्रतिनिधी
म्हणून त्यांनी अतिशय चांगले नाव कामविलेले आहे. ते देत असलेल्या विमा
विषयक सुविधांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मला वाटते